
वाकेड येथे दुचाकीला टेम्पोची धडक पती मृत्युमुखी, पत्नी गंभीर जखमी
लांज्याजवळील वाकेड येथे टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत मधुसुदन लिंगायत यांचा जागीच मृत्यू झाला त्यांची पत्नी माधवी लिंगायत गंभीर जखमी झाल्या हा अपघात वाकेड येथे सायंकाळी सहा वाजता झाला
मधुसुदन लिंगायत हे आपली पत्नी माधवी हिच्यासह दुचाकीवरून कासार्डे कणकवली या आपल्या मुळगावी जात होते वाकेड येथे आले असता समोरून येणाऱ्या आयरिश टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली गंभीर जखमी झालेल्या माधवी लिंगायत यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करणेत आले आहे
www.konkantoday.com