कोकणात पर्यटनातून रोजगार वाढावा यासाठी लवकरच हॉटेल रिसॉर्ट, बीच पॉलिसी आणणार
कोकणातील पर्यटन विकासाच्या माध्यमातून रोजगार वाढावा यासाठी लवकरच हॉटेल रिसॉर्ट पॉलिसी आणि बीच पॉलीसी आणणार असून त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत दिली.
आमदार भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक यांनी कोकणात पर्यटन विकास रखडल्याबाबतचा मुद्दा तारांकीत प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता.
चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग, सागरी महामार्ग होत असून पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. कोकणात एमटीडीसी रिसॉर्ट किंवा प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये हॉटेल्स, छोटेमोठे रिसॉर्ट, निवासाची सुविधा, पर्यटन प्रकल्पासाठी इतर प्रकल्प उभारण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी त्यांनी माहिती दिली.
www.konkantoday.com