किल्ले रत्नदुर्गवर स्वच्छता मोहीम

रत्नागिरी :- गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने रत्नागिरी येथील रत्नदुर्ग किल्ल्यावर नुकतीच मंगळवार २७ मे रोजी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले हे मनाला शक्ती, उर्जा देणाऱ्या वास्तू आहेत. याचे जतन, संवर्धन, संरक्षण झालेच पाहिजे.आज सर्वत्र आपण पाहतो गडकिल्लेवर येऊन जी मद्यपी लोक हे दारूच्या बाटल्या टाकत असतात तर पर्यटक हे पाण्याच्या, थंडपेयाच्या बाटल्याचा कचरा करत असतात. आपल्या गडकिल्लेचे ऐतिहासिक वारसाचे मोठ्याप्रमाणात नुकसान करतात. संपूर्ण गडकिल्लेचा परिसर दारूच्या/ बिअर च्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या यांने छाणेरडा अस्वच्छ करून टाकतात. सर्वत्र बाटल्यांचा खच पसरलेला दिसतो. अशा वेळी नेहमीच गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य नेहमीच स्वच्छता मोहीमेत अग्रेसर असते. जेणेकरून पुढील येणाऱ्या पिढीला हा गढकिल्ल्याचा इतिहास समजू शकेल, या इतिहासामधून सर्वांना प्रेरणा मिळेल ह्याच भावनेतून गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाच्यावतीने स्वच्छता मोहीम श्री. दिपेश वारंग यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आली. ह्या किल्ले रत्नदुर्ग स्वच्छता मोहीम मध्ये सुमारे ८०० दारूच्या बाटल्या व प्लॅस्टिक बाॅटल भेटल्या.
स्वच्छता मोहीम मध्ये गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे अनिकेत वाडकर, प्रणव सिनकर, शुभम आग्रे, साहिल जाधव, मंथन पाडावे, मयूर भितळे, समुर्द्वी चाळके, मानसी चव्हाण, सेजल मेस्त्री, खुशी गोताड, ओमकार सावंतदेसाई, सौरभ बळकटे, तन्मय जाधव, अर्थव रसाळ, प्रीतम मांडवकर, रश्मी जाधव, श्वेता भितळे असे सुमारे ३० दुर्गसेवक व दुर्गसेविका सहभागी होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button