
दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त केली
दापोलीच्या गौरी पटवर्धन हिनं अमेरिकेमध्ये फिजिक्स विषयामध्ये पीएचडी प्राप्त करून दापोलीचा झेंडा सातासमुद्रा पार पडकवला आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहराजवळील गिम्हवणे गावची सुकन्या असलेली गौरी नरेश पटवर्धन हिने अमेरिकेतील कॉर्नल विद्यापीठाची फिजिस्क विषयातील पीएचडी (डॉक्टरेट)संपादन केली.
कोकणातील दापोली येथील सुप्रसिद्ध असलेले ह्रदयरोगतज्ञ डॉ.नरेश व गायनॉकॉलॉजिस्ट असलेल्या डॉ.निवेदिता पटवर्धन यांची ती सुकन्या आहे. बि.टेक.पर्यंतचे शिक्षण भारतात पूर्ण करून ती पूढील शिक्षण आणि संशोधनसाठी तिने अमेरिकेतील कॉर्नल विद्यापीठात प्रवेश मिळवला. तेथे ती मागील सात वर्षे संशोधन करत आहे. तीने भौतिकशास्त्र (फिजिक्स) या विषयात प्रकाश विज्ञान विभागातील नॉन लिनीअर ऑप्टिक्स यावर संशोधन पूर्ण करून शोधनिबंध सादर करुन सर्वोच्च मानाची डॉक्टरेट ही पदवी संपादित केली तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com