![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2020/02/images.jpeg-412.jpg)
रिफायनरीला विरोध करण्यासाठी शिवसेना शाखाप्रमुखांवर तालुकाप्रमुख दबाव आणत असल्याचा आरोप
सागवे विभागातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकार्यांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या पायाखालची जमीन सरकरली आहे. आता सागवे विभागात फिरून राजीनामे दिलेल्या काही शाखाप्रमुख व पदाधिकार्यांवर दबाव आणून आमचा रिफायनरीला विरोध आहे, आम्ही शिवसेनेसोबत आहोत, असे लेखी पत्र घेण्याची धडपड त्यांनी सुरू केल्याचा आरोप सागवेचे माजी विभागप्रमुख राजा काजवे व माजी उपविभागप्रमुख महेश मांजरेकर यांनी केला आहे.
www.konkantoday.com