
राज्य कृषि पणन मंडळातर्फे आंबा निर्यात प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
राज्य कृषी पणन मंडळ आयोजित पाच दिवसांचे निवासी आंबा निर्यात प्रशिक्षण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या पाच जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. निर्यातदार बनू इच्छिणार्या उत्पादकांसाठी हा पणन मंडळाने प्रयत्न केला आहे.
प्रशिक्षणासह इच्छूक उमेदवारांनी आपली नावे जिल्हा पणन अधिकार्यांकडे प्रशिक्षण शुल्कासह द्यावयाची आहेत. हे प्रशिक्षण पाच दिवसांचे असून दोन दिवस त्या त्या जिल्ह्यात व तीन दिवस मुंबई (वाशी) येथे होईल. मुंबई (वाशी) येेथे निर्यातीसाठी आवश्यक सर्व सुविधा व तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध असल्यामुळे तीन दिवसांचे प्रशिक्षण वाशीत होणार आहे.
निर्यात परवाना, प्रमाणीकरण, मँगोनेट, पॅकेजिंग, निर्यात पद्धती, वाहतूक निर्यातीसाठी योजना, जीआय नोंदणी, कस्टम हाऊस, विमा सुविधा केंद्र, आयातदार शोधणे इत्यादी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. निर्यातीसाठी आवश्यक सुविधा केंद्रांना प्रत्यक्ष भेट व तज्ज्ञांकडून सुविधेबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com