
रत्नागिरी जिल्हा कोकणात गुन्हेगारीच्या बाबतीत चौथ्या स्थानावर
राज्यात सर्वत्र चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ होत असताना रत्नागिरी जिल्ह्यात हे प्रमाण तुलनेने कमी राहिले आहे. कोकण परिक्षेत्रातील चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा नुकताच विशेष महानिरीक्षकांनी घेतला. त्यानुसार कोकण परिक्षेत्रात ५ जिल्ह्यातील गुन्हेगारीत रत्नागिरी चौथ्या तर सिंधुदुर्ग पाचव्या क्रमांकावर आहे. चोरीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात कोकणात पालघर जिल्हा प्रथम, रायगड दुसर्या तर ठाणे तिसर्या क्रमांकावर आहे. महानगरांचा समावेश असलेल्या ठाणे, रायगड, पालघर हे जिल्हे सोनसाखळी चोरीसह चोरी, घरफोडीवर आघाडीवर आहेत.
www.konkantoday.com