
बैलगाडीची सवारीची रपेट पर्यटकांना घडवुन
नितीन नागले या तरूणाने स्व-रोजगार शोधला
रोजगार कुठे आयता मिळत नाही, तर तो आपणच तयार करायला हवा, रत्नागिरी तालुक्यातील नितीन नागले या तरूणाने स्व-रोजगार शोधून काढला.अन् त्यातून उदरनिर्वाहही तो करीत आहे. त्याची आरे समुद्रकिनारी रपेट मारणारी बैलगाडीची सवारी पर्यटकांना आकर्षिक करीत आहे.व्यवसाय हा शोधायचा असतो. शोधले कि सापडते . रत्नागिरी तालुक्यातील आरे समुद्र किनारी पर्यटकांना बैलगाडीची सफर घडवणारा हा स्थानिक गाडीवान . स्वछ सुंदर बैलगाडी ,छान आसन व्यवस्था, रोज आंघोळ घालुन ताजातवाना डौलदार पांढरा शुभ्र नंदी सजवलेली बैलगाडी पुण्या मुबंई च्या पर्यटकांसाठी आकर्षक न ठरेल तर नवलच . आणी हो पर्यटक देतील ते खुषीत घेणारा हा कोकणातील तरुणाचा आदर्श स्थानिक तरुणांनी नक्कीच घ्यावा.
बैलांचा कासरा थेट पर्यटकांच्या हातात देऊन बैलगाडी तुम्हीच चालवा असे सांगुन मर्चिडिस , बीएमडब्लु , चालविणार्या अशा करोडपती लोकांना बैलगाडी चालवायला लावतो. बैल पण मस्त शिकवलेला या करोडपतिंना बैलगाडी चालवायचा आनंद देतो.
साधारणत: तीन तासात हजारभर रूपये मिळतात. सकाळच्यावेळी रत्नागिरीपर्यंत दुधाचा व्यवसाय करायचा आणि दुपारी 3 नंतर पर्यटकांना बैलगाडीची रपेट मारण्यासाठी जायचे, असा साधारण दिनक्रम नागले यांचा असतो. या सर्वामध्ये त्यांच्या पत्नी नेहा यांचाही तितकाच हातभार असतो.
ही बैलगाडी कोकणची अप्सरा या नावाने परिसरात प्रसिद्ध आहे.
www.konkantoday.com
