जमिनीमध्ये व पेट्रोल पंपात पैसे डबल करून देतो असे सांगून दोन कोटी रूपयाची फसवणूक करण्याचा प्रकार ,७जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड तालुक्यातील सवेणी भोईवाडी येथील भाबल कुटुंबीयांनी ठाणे येथील संजय कदम यांची जमिनीमध्ये व पेट्रोल पंपांमध्ये पैसे डबल करून देतो असे सांगून त्यांची दोन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणेत आला आहे या प्रकरणी साै.नम्रता नितीन भाबल,साै. प्रणाली राजेश भाबल,अक्षय नितीन भाबल,चिन्मय नितीन भाबल यांना पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणामध्ये नितीन भाबल ,राजेश भाबल, प्रथमेश भाबल हे तीन आरोपी फरार आहेत ठाणे येथील राहणारे संजय कदम यांची आरोपी भाबल कुटुंबीयानी आेळख करून घेतली त्यांना पेट्रोल पंपांमध्ये पैसे गुंतवून डबल करून तुमचा फायदा करून देतो असे सांगून त्यासाठी साठेखत करून त्यात स्वतःची नावे घालून घेतली तसेच जमिनीत पैसे गुंतवण्यासाठी एकूण दोन कोटी रुपयांची रक्कम घेऊन आपापसात वाटुन घेतली व फिर्यादीची फसवणूक केली
www.konkantoday.com