काजरघाटी येथे डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघात


काजरघाटी येथे डंपरचा ब्रेक फेल झाल्याने अपघातात झाला असून भर रहदारीच्या रस्त्यावर हा डंपर उलटला. उतारात ब्रेक फेल झाल्याने चालकाने आरडाओरड केल्याने आजुबाजूची माणसे सावध झाली. रस्तावरून जाणार्‍या दुचाकी चालकानी उड्या मारून दुचाकी तेथेच सोडून बाजूला गेल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. शिवाय डंपरही पुढे जावून पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याचे वृत्त आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button