एमआयडीसी कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपये भरणार
रत्नागिरी औद्योगिक विकास महामंडळाने जप्तीची पुढील कारवाई टाळण्यासाठी २० लाख रुपये भरण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी त्याबाबत न्यायालयात प्रक्रिया होणार आहे. मात्र ठेकेदार कंपनीने ७२ लाखांवर ४ कोटी ३८ लाख एवढी भरपाईची रक्कम आकारली. याबाबत एमआयडीसीने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जी रक्कम निश्चित होईल, ती भरली जाणार असल्याचे एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता परशुराम करावडे यांनी सांगितले.
www.konkantoday.com