
रिफायनरीसाठी आमची जमीन घ्या, विखारे, गोठणे भागातील शेतकर्यांची मागणी
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून राजापूर तालुक्यात वातावरण तापले असतानाच आता रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने उघडपणे अनेकजण उतरले आहेत. राजापूर तालुक्यातील विखारे गोठणे परिसरातील काही शेतकर्यांनी आमच्या जमिनी रिफायनरी प्र्रकल्पासाठी घ्याव्यात अशी लेखी मागणी केली आहे.
या प्रकल्पामुळे तालुक्याचा विकास होणार असल्याने ज्या प्रकल्पग्रस्त जनतेचा विरोध असेल त्यांच्या जमिनी वगळून आमच्या लगतच्या जमिनी घ्या पण प्रकल्प करा अशी मागणी पुढे येत असून विखारे गोठणे येथील प्रकाश भिवंदे यांनी गावातील आम्ही शेतकरी ६०० एकर जमीन प्रकल्पासाठी देण्यास तयार असल्याचे पत्र दिले आहे.
www.konkantoday.com