
स्टरलाईच्या जागेवर मरिन पार्क किंवा मँगो पार्क उभा करणार
रत्नागिरी एमआयडीसीतील स्टरलाईटच्या ताब्यात असलेल्या झाडगांव एमआयडीसीतील ६५३ एकर जमीन लवकरच एमआयडीसीला मिळणार असून ही जागा ताब्यात घेवून त्या ठिकाणी मरिन पार्क किंवा मँगो पार्क उभारण्यात येणार आहे. सिंधुुदुर्गात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी सध्या या जागेचा ताबा स्टरलाईट कंपनीकडे आहे. त्यासाठीचा असलेला एमआयडीसीचा कर कंपनी भरत आहे. मात्र कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे सध्या जागेचा दर वाढला असल्यामुळे कंपनीकडे असलेल्या मालमत्तेची किंमत वाढली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना या ठिकाणचा ताबा एमआयडीसीला कसा मिळणार? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
www.konkantoday.com