
लोट्याच्या उद्योगांसाठी बंधार्याचे काम तातडीने आवश्यक -प्रशांत पटवर्धन
जर वाशिष्ठी नदीवर बंधार्याचे काम तात्काळ हाती घेतले नाही तर येत्या दोन महिन्यात लोटे परिसरातील उद्योग ठप्प होतील अशी भीती उद्योजक संघटनेेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी व्यक्त केली आहे. सध्या लोट्यातील कारखान्यांना एमआयडीसी वाशिष्ठी नदीतून पाणी पुरवते. एमआयडीसी वाशिष्ठी नदीतून २३ एमएलटी पाणी उचलते. उन्हाळ्यात वाशिष्ठी नदीची पातळी कमी होत असल्याने या ठिकाणी बंधारा घालण्याचा प्रस्ताव उद्योजक संघटनेकडून देण्यात आला. त्याला मंजुरीही मिळाली आहे. तसेच हा बंधारा सध्या असलेल्या जॅकवेलच्या ठिकाणी तातडीने बांधणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार आहे.
www.konkantoday.com