तिवरेवासीयांना आता मातीचे धरण नको, कॉंक्रीटचे धरणाची मागणी


मातीच्या धरणाला प्रखर विरोध दर्शवताना कॉंक्रीटचे तेही पूर्णपणे नवे धरण बांधावे, असा एकमुखी ठराव तिवरेवासियांनी ग्रामसभेत केला.
२ जुलैच्या रात्री २८ लाख घनमीटर पाण्याने पूर्ण भरलेले तिवरे धरण फुटले आणि क्षणातच होत्याचे नव्हते झाले. यामध्ये प्रचंड जीवित व वित्तहानी झाली. शासनाने मृतांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई दिली तरी पुनर्वसनाह अन्य प्रश्‍न कायम आहेत. आता धरण पुनर्बांधणीची चर्चा सुरू झाली असून आमदार शेखर निकम यांनी ९ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे सांगितले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button