कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे निधन
कोकण कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. प्रतापराव साळवी यांचे पुण्यात निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
साळवी यांचा जन्म फणसोप (ता. रत्नागिरी) येथे १ जून १९३१ रोजी झाला. पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बीएससी पदवी मिळाल्यानंतर ते कृषी विभागाच्या सेवेत रुजू झाले. सेवेत असताना त्यांनी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातून एम.एस. आणि पीएचडी पदव्या संपादन केल्या.
२६ ऑक्टोबर १९७० ते ९ डिसेंबर १९८७ या काळात ते कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानंतर परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपदही त्यांनी चार वर्षे सांभाळले हाेते.
www.konkantoday.com