
शालेय विद्यार्थ्यानी काटकसर करून दिले शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालय, हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. फटाक्यांवर खर्च न करता बचत केलेली ७६ हजार रुपयांची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबियांना देवून विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे. सदर रक्कमेचा धनादेश मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, विद्यार्थ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या मदतनिधीला दिला आहे.
www.konkantoday.com