रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये एक तासात मुलग्याची मुलगी झाली
ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची काल सकाळी सिझर करून प्रसूती करण्यात आली हॉस्पिटलकडून सदर महिलेला व नातेवाईकांना मुलगा झाल्याचे सांगण्यात आले मुलगाही दाखवण्यात आला मुलगा झाल्याने आनंदी झालेल्यानी सर्व नातेवाईकांनाही गोड बातमी सांगितली केसपेपर ही मुलग्यांची ची नोंद करण्यात आली त्यानंतर एक तासाने हॉस्पिटलच्या सिस्टर आल्या त्यानी महिलेला व नातेवाईकांना सांगितले की तुम्हाला मुलगा नाही तर मुलगी झाली आहे नर्सच्या बोलण्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले हे कसे शक्य असे त्याने विचारले तुम्ही सांगता आम्हाला मान्य नाही असे सांगून त्यांनी आपल्या ओळखीच्या नेत्यांना बोलावून घेतले तसेच या प्रकरणात मंगेश फटकरे यांनीलेखी तक्रारही केली यामुळे गोंधळाचे वातावरण झाले शेवटी सिव्हिल सर्जन यांनी सर्व रागरंग पाहून आम्ही डीएन अे टेस्ट करण्याचे व कमिटी नेमण्याचेआश्वासन दिले मात्र नेमके हे प्रकरण काय आहे याबाबत कुजबुज सुरू आहे
www.konkantoday.com