
डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण संस्थेतर्फे पानीपतकार विश्वास पाटील, डॉ. कदम, नरकेंना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण यांच्याकडून दरवर्षी राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराचे वितरण केले जाते. यामध्ये साहित्य, शिक्षण, सहकार, कृषी, क्रीडा, कला व समाज कार्य या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. यंदा हा पुरस्कार कादंबरीकार, पानीपत व महानायक सारख्या कादंबर्याच ज्यांच्याहस्ते लिहिल्या गेल्या ते साहित्यिक विश्वास पाटील यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार भारती विद्यापीठाचे कुलपती शिक्षणतज्ञ डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षणामध्ये केलेल्या सर्वोच्च कामगिरीबाबत त्यांना शिक्षणरत्न जीवनगौरव पुरस्कार, सहकारातून शेतकर्यांाच्या उन्नतीचा मार्ग दाखवणारे व गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरूण नरके यांना कृषी व सहकाररत्न जीवनगौरव पुरस्कार, चंद्रकांत पंडित भारताचे माजी क्रिकेटपटू यष्टीरक्षक यांना क्रीडारत्न जीवनगौरव पुरस्कार या पुरस्काराने सर्वांना गौरविण्यात आले.
www.konkantoday.com