सरकारची केवळ आश्वासने गेल्या पाच वर्षात सरकारने एकही घर गिरणी कामगारांसाठी बांधले नाही -गिरणी कामगारांचा संताप
शासनाच्या उदासीन धोरणामुळे गिरणी कामगारांना सर्वस्व गमवावे लागले आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने गेल्या ५ वर्षात गिरणी कामगारांसाठी एकही घर बांधले नाही, असा संताप व्यक्त करत गिरणी कामगार संघटनेने आता थेट विधी मंडळावर धडक देण्याची घोषणा केली. २७ फेब्रुवारी रोजी गिरणी कामगारांचा हा महामोर्चा निघणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेवून निवेदन सादर करणार आहेत.
www.konkantoday.com