
ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला
* सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे ईव्हीएम मशीनबाबत छेडछाड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून एका मतदाराने जाळण्याचा प्रयत्न केला.सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे शांतपणे मतदारप्रक्रिया सुरू होती. अशात एका मतदाराने ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे ईव्हीएम मशीनचे थोडे नुकसान झालं आहे.या घटनेनंतर बागलवाडी येथे काही काळ मतदान प्रक्रिया शांत झाली होती. सांगोला येथील सहायक्क निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घडल्या घटनेबाबत बोलण्यास नकार दिला.www.konkantoday.com