
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, रायगड मध्ये दोन लक्झरी बसेस मोठ्या खड्ड्यात अडकल्याने काही काळ वाहतूक ठप्प
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खांब गावाजवळ भला मोठा खड्डा पडला आहे. सोमवारी (ता. 26) मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास या मोठ्या खड्ड्यात दोन बस अडकल्याने येथील वाहतूक बंद झाली होती.लागलीच क्रेनच्या साह्याने दोन्ही बस बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर चालू झाले. आणि 1:20 वाजताच्या सुमारास दोन्ही बस बाहेर काढण्यात आल्या ब त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेचे (SVRSS) सदस्य घटनास्थळी उपस्थित असून दोन्ही बस बाजूला काढण्यासाठी सहकार्य केले