
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी १६ रोजी दापोलीत
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा ३८ वा पदवीदान समारंभ १६ फेब्रुवारी रोजी आहे. हा पदवीदानाचा कार्यक्रम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
दापोली येथील विद्यापीठाच्या विजय क्रीडा संकुलामध्ये पदवीदान समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषीमंत्री तथा विद्यापीठाचे प्रतीकुललपती दादाजी भुसे, जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com