
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात भव्यदिव्य “गावशिवार” थिम डिनरचे १६ फेब्रूवारी रोजी आयोजन
रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयातील हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने यावर्षी “गावशिवार” या थिम डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. १६ फेब्रूवारी २०२० रोजी रत्नागिरीकरांना महाराष्ट्रातील विविध खाद्य संस्कृतीचे पदार्थ खाण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्याच बरोबर “गर्जा महाराष्ट्र” या दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्रातील विविध कला संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.
कोकणातील खेड्यातील, ग्रामीण भागातील उपेक्षित वंचित दुर्लक्षित मुला-मुलींना उच्च शिक्षणाच्या सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी “शिक्षणाच्या हक्कासाठी” हे ब्रीद घेऊन नवनिर्माण शिक्षण संस्थेची स्थापना १९९८ मध्ये झाली. रत्नागिरी, संगमेश्वर, दोडामार्ग (सिंधुदूर्ग) आणि मुंबई (रात्र शाळा) या ठिकाणी संस्थेच्या विविध (केजी ते पीजी) शैक्षणिक अभ्यासक्रमातून ६००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. स्थानिक, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रोजगाराच्या आणि व्यक्तिमत्व विकासाच्या
संधी तरुणाईला उपलब्ध व्हाव्यात यासाठी पारंपारीक अभ्यासक्रमाबरोबरच विविध व्यवसायभिमुक अभ्यासक्रमांचे पदवी आणि पदव्यतूत्तर अभ्यासक्रम महाविद्यालयातून सुरु करण्यात आले.
या माध्यमातून आज हॉटेल इंडस्ट्री, कॉर्पोरेट, आयटी इंडस्ट्री, बँकिग सेल्फ एम्लॉमेंट या क्षेत्रात, देशातील विविध भागात आणि परदेशात हजारो तरुण आपले स्वप्न साकार करीत आहेत.
एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाची स्थापना २०११ साली झाली. महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून हॉस्पिटॅलिटी स्टडीज या अभ्यासक्रमासाठी प्रवेश होत आहे. सुसज्ज भौतिक सुविधासह अनुभवी तज्ज्ञ प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक करण्याची संधी यातुन विद्यार्थ्यांना प्राप्त झाली. क्रुझ, फ्लाईट, पर्यटन, रेल्वे, रेस्टॉरंट पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रचंड रोजगार या विद्यार्थ्यांना उपलब्ध असल्याने कोकणातील विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे मोठ्या संख्येने वळत आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेल्या थिम डिनर
७व्या वर्षी जल्लोषात रविवार दिनांक – १६ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. थिम डिनर वर आधारलेला हा कार्यक्रम सायं. ०७.०० ते १०.०० वाजेपर्यंत रंगणार आहे.
यावर्षी “गावशिवार” अंतर्गत विविध ग्रामीण खाद्यसंस्कृतीची रेलचेल असणार आहे . खवय्यांसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे. या दरम्यान “गर्जा महाराष्ट” हा दर्जेदार सांस्कृतिक मनोरंजनाचा कार्यक्रम होणार असुन या बरोबर विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी रत्नागिरीकरांसाठी निर्माण झाली आहे.
या भव्यदिव्य कार्यक्रमाचे सोबती होण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. ताराचंद ढोबाळे (७७१९८५१०२५) विद्यार्थी प्रतिनिधी कु. अनिकेत सांवत (९३२५०३४५४१) यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री. अभिजीत हेगशेट्ये यांच्या वतीने करण्यात आले आहे .