
आंबा शेतकरी समोरील अडचणी वाढल्या अनेक ठिकाणी प्र्रयत्न करूनही बँकांकडून अद्यापही व्याजमाफी नाही
रत्नागिरी जिल्ह्यातील नैसर्गिक परिस्थितीमुळे सध्या आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून खर्च व उत्पादन याचा मेळ बसणे कठीण झाले आहे. शासनाने २०१५ साली घोषित केलेली पीक कर्जाच्या व्याजाची माफी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडे अनेकवेळा मांडूनही अद्यापही मिळाली नसल्याने आंबा व्यावसायिक अडचणीत आले आहेत. सध्या ज्या नैसर्गिक परिस्थितीमुळे यावेळी आंबा पिक २५ टक्के येण्याची शक्यता आहे. याशिवाय हे पिक एप्रिल व मेमध्ये येणार असल्याने आंब्याला भाव मिळणेही कठीण होणार आहे. आंबा पिकासाठी फवारणी, खते व मजुरीचा खर्च वाढत असल्याने या ठिकाणी आंबा उत्पादक शेतकर्यांसमोर समस्या उभी राहिली आहे. याशिवाय या वस्तूंवरील जीएसटीमुळे ही उत्पादने महाग झाली आहेत. याशिवाय पिकविमा घेवूनही विमा कंपन्या नुकसान भरपाई म्हणून हप्त्याच्या मानाने अल्प नुकसान भरपाई देत असल्याने विमा योजनेचाही कोणताही फायदा होत नसल्याचे आंबा उत्पादकांचे म्हणणे आहे. त्यामुळे विमा कंपन्यांकडे आंबा उत्पादकांनी पाठ फिरवली आहे. त्यातच शासनाने १९१५ साली जीआर काढूनही लीड बँकेने अद्यापही आंबा उत्पादकांची अंदाजे २० ते २५ कोटी रुपये व्याजाची रक्कम माफ केलेली नाही. यामुळे सध्या राज्यात आलेल्या नवीन सरकारने आंबा उत्पादकांना न्याय द्यावा अन्यथा आंबा उत्पादकांना आत्महत्या करण्याशिवाय मार्ग राहणार नाही अशी प्रतिक्रिया आंबा उत्पादकांकडून आज झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली. या पत्रकार परिषदेला जिल्हा आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत तुकाराम घवाळी प्रकाश साळवी प्रसन्न पेठे उमर धामस्कर राजन कदम उपक्रम नाकवा सुरेंद्र देवळेकर मुदत सरमुकादम आदी उपस्थित होते
www.konkantoday.com