लोटे आयुर्वेद महाविद्यालयात जिज्ञासा मार्फत अभाविप कडून परिसंवादाचे आयोजन
एम.इ.एस. आयुर्वेद महाविद्यालय लोटे खेड येथे जिज्ञासा व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला तसेच परशुराम रुग्णालयातील डॉक्टर देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते सुप्रसिद्ध आयुर्वेद चिकित्सक वैद्य समीर परांजपे (दापोली) यांनी आपल्या सहज सोप्या भाषेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला व आयुर्वेद जीवनपद्धती म्हणून अवलंब करण्यासाठी विद्यार्थांना मार्गदर्शन केले , तर या कार्यक्रमात एम. इ.एस.आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य वैद्य सचिन उत्पात सर यांनी आयुर्वेदाला प्राथमिक चिकित्सा पद्धत कशाप्रकारे बनवता येईल या बद्दल मार्गदर्शन केले.
त्याचबरोबर मार्च महिन्यामध्ये जिज्ञासा आंतराष्ट्रीय परिसंवाद चे पोस्टर व महाविद्यालयातील रक्तगट सूची यांचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात धन्वन्तरी पुजनाने झाली. कार्यक्रमाचा समारोप वैद्य गणेश पाटील सर यांनी केला.दर्शन आखाडे, मुद्रा दळवी, अंकिता काबरा,पौरणीमा पाटील, मेघना पाटील, स्नेहा देवडीगा, अक्षता सरणेकर, मनोज म्हस्के, मृणाल वाळुंजकर, सत्यम देशमुख, सफिया अन्सारीआदी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.
www.konkantoday.com