
रत्नागिरी शहरात सिटीप्राईड ब्रँडच्या वतीने उभारण्यात आलेल्या अद्यावत मल्टीफ्लेक्स चित्रपटगृहाचा गुरूवारी शुभारंभ
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथील सिद्धिविनायक नगर येथील मॉलमध्ये सिटीप्राईड ब्र्रँडच्यावतीने मल्टीफ्लेक्स चित्रपटगृहाचा शुभारंभ ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते गुरूवारी होत आहे अशी माहिती चाफळकर उद्योगसमुहाचे व सिटीप्राईड ब्रँडचे प्रकाश चाफळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठिकाणी तीन स्क्रिन असून प्र्रत्येकी २५० लोकांची क्षमता आहे. अत्यंत अत्याधुनिक व एअरकंडीशन पुशबॅक सीटस् व सोफासेट तसेच आकर्षक असे इंटेरिअर असलेली ही तीन स्क्रिन आता रत्नागिरीतील चित्रपटप्रेमींना शुक्रवारपासून उपलब्ध होणार आहेत. चाफळकर उद्योग समुहाने रत्नागिरी जिल्ह्यात १९३९ साली खेडमध्ये चित्रपटगृहाची सुरूवात केली त्यानंतर रत्नागिरीत १९५६ साली राधाकृष्ण चित्रमंदिरची निर्मिती केली. त्यानंतर आता आधुनिक गरज लक्षात घेवून सिटीप्र्राईड ब्रँडखाली त्यांनी मल्टीफ्लेक्स थिएटरची उभारणी करण्यास सुरूवात केली. रत्नागिरीत शिवाजीनगर येथे आता या मल्टीफ्लेक्स थिएटरच्या रूपाने चित्रपटरसिकांना आता नवीन दालन उपलब्ध होत आहे. मुंबईच्या मल्टीफ्लेक्समधील सुविधा असलेली सुविधा रत्नागिरीकरांना आता येथे उपलब्ध होणार आहे. सध्या या ठिकाणी प्रत्येक स्क्रिनमध्ये ५ शो असे १५ शो होत आहेत. त्याशिवाय मराठी चित्रपटही येेथे दाखविण्यात येणार आहेत. या मल्टीफ्लेक्स थिएटरच्या ठिकाणी पार्किंग व मॉलमधील अन्य सुविधा असल्याने येणार्या सिनेरसिकांना येथे सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शुभारंभाच्यावेळी मान्यवरांना तानाजी व अन्य चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. या मल्टीफ्लेक्सचे बुकींग ऑनलाईन तसेच तिकिटाचे दर डायनॅमिक पद्धतीने राहणार आहेत. रत्नागिरी शहराच्या ठिकाणी अशी दर्जेदार सुविधा उपलब्ध झाल्याने रत्नागिरीसह आजुबाजूच्या तालुक्यातील सिनेरसिकांना त्याचा लाभ मिळू शकणार आहे.
www.konkantoday.com
