
जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन १६ फेब्रुवारीला
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालयाचे ४४ वे वार्षिक अधिवेशन १६ फेब्रुवारीला साळवी स्टॉप येथील माध्यमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन होईल. जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मुरलीधर बोरसुतकर, कोकण विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष रविंद्र उर्फ भाई कालेकर, कोषाध्यक्ष गजानन कालेकर, सौ. अनुराधा तारगावकर, सौ. साधना कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
www.konkantoday.com