देवरूख कला महाविद्यालयात रविवारपासून संकल्पन कलाप्रदर्शन


देवरूख कला महाविद्यालयाच्या (डी-कॅड) निर्मितीपासूनची प्र्रक्रिया प्रवास रंगाचा या थीमद्वारे उलगडली जाणार आहे. सायकल, प्रायमरी रंग, भिंगरी हे बोधचिन्ह घेवून दि. ९ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत डी-कॅडमध्ये संकल्पन २०२० वार्षिक कला प्रदर्शन सुरू राहणार आहे.
प्र्रवास रंगाचा या कलाप्रदर्शनाचे उदघाटन ९ फेब्रुवारीला सायंकाळी ४ वा. औरंगाबाद येथील डॉ. शिरीष अंबेकर यांच्या हस्ते चित्रकार संजय टिक्कल यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष अजयशेठ पित्रे, प्राचार्य रणजित मराठे, विद्यार्थी प्रतिनिधी शार्दुल गानू, अभिषेक राठोड, सायल पालकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. कला प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी डी-कॅडचे प्र्राध्यापक, विद्यार्थी अथक प्रयत्न करीत आहेत. सलग आठ दिवस सुरू राहणार्या कला प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरिक, रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button