एयु स्मॉल फायनान्स बँकेतर्फे रहाटागरात दिव्यांगांसाठी व्हिलचेअर


रहाटागर बसस्थानकामध्ये दिव्यांग व्यक्ती आणि वयोवृद्ध प्रवाशांकरिता एयु स्मॉल फायनान्स बँकेने दोन व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या दोन व्हिलचेअरचे लोकार्पण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, विभाग नियंत्रक सुनिल भोकरे आणि एयु स्मॉल बँकेचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत शिंदे यांच्या हस्ते झाले.
बँकेने सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या या उपक्रमाचा दिव्यांग व ज्येष्ठांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक श्री. कदम, मार्केटींग मॅनेजर प्रकाश धर्माधिकारी, शाखाधिकारी गीतेश जामसंडेकर, असेंट ब्रँच मॅनेजर रविंद्र सावर्डेकर, प्रसाद मोदी, काशीनाथ सपकाळ, आगार व्यवस्थापक अजय मोरे, श्री. गाडे आणि एसटीचे अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button