
मंडणगड तालुक्यातील कादवण देवूळवाडी येथील जंगली प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत
मंडणगड तालुक्यातील कादवण देवूळवाडी येथील जंगली प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्या मृत पावल्याची घटना शनिवारी ( दि. 16 ) रोजी घडली. या बकऱ्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावल्याचा अंदाज असल्याचे वनविभागाचे वनपाल तौफिक मुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.मंडणगड तालुक्यातील कादवण देवूळवाडी येथील शेतकरी काशीराम सोंडकर यांच्या रानातील गोठ्यात शनिवारी रात्री जंगली प्राण्याने पाच बकऱ्यांना मारून टाकले. त्यामध्ये तीन बकऱ्या आणि दोन बोकडांचा समावेश होता. मारलेल्या पाच बकऱ्यांपैकी एक बकरी जंगली प्राणी घेवून गेला, या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बकऱ्यांवरील हल्ला वाघाने केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मंडणगडमध्ये बिबट्याचे वास्तव्य आहे. वाघाचे वास्तव्य नाही, त्यामुळे मृत बकऱ्या बिबट्याने मारल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.