कोकणात मत्स्य क्षेत्राला चालना देण्यासाठी मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर यांचा पुढाकार

रत्नागिरी ः कोकणला ७२० कि.मी.चा विस्तीर्ण सागर किनारा लाभला असून या सागरी किनारी मासेमारी, मत्स्यशेती, कोळंबी शेती, खेकडा शेती, पिंजर्‍यातील मत्स्य संवर्ंधन आदी गोष्टींमधून मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी व आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असून मत्स्योद्योगामुळे मोठ्या प्रमाणावर विदेशी चलनही मिळू शकते. यासाठी समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय यादवराव आदींच्या शिष्टमंडळाने नुकतीच मत्स्योद्योगमंत्री महादेव जानकर यांची भेट घेवून त्यांच्यासमोर विविध प्रश्‍न मांडले. त्याला जानकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मत्स्योद्योगाच्या विकासासाठी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास मंडळ स्थापन करण्यात आले असून त्याकडे दरवर्षी ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मत्स्यशेतीसाठी मत्स्यबीज उपलब्ध होण्यासाठी हॅचेरीचे काम लवकर करण्यात यावे व कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात हॅचेरी स्थापन करण्यात यावी ही शिष्टमंडळाची मागणी जानकर यांनी मान्य केली.
मत्स्यशेतीसाठी सीआरझेडच्या नियमात शिथिलता आणावी. मत्स्य प्रशिक्षणासाठी रत्नागिरी येथे महाविद्यालय असून आता एक उपकेंद्र पालघर येथे स्थापन करण्यात येणार असून मत्स्यशेतीसाठी शासकीय धरणे व खाजण जमिनी भाडे तत्वावर देण्याच्या प्रक्रिया अशा मागण्या शिष्टमंडळाच्यावतीने करण्यात आल्या. त्याला जानकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने या मागण्या पूर्ण होतील असा अंदाज आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button