
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे १७ रोजी रत्नागिरीत
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा रत्नागिरी दौरा निश्चित झाला आहे. त्यांच्या हस्ते गणपतीपुळे येथील विकास आराखड्यातील काही कामांचे भूमिपूजन केले जाणार आहे. मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच उद्धव ठाकरे रत्नागिरीत येत असल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे. १७ फेब्रुवारी रोजी ते कोकण दौर्यावर आहेत. सिंधुदुर्गात आंगणेवाडी यात्रेसह ते रत्नागिरीतही येणार आहेत.
www.konkantoday.com