बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून बहिण-भावाची ऑनलाईन फसवणूक


बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून बँकेचा खाते क्रमांक विचारून बहीण-भावाच्या खात्यातून १० हजार ७७५ रु. काढून घेतल्याची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोपी-रोहिदासवाडी येथील प्रकाश तुकाराम खोपकर व त्यांची बहिण रेश्मा खोपकर या दोघांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. प्रकाश खोपकर व त्यांची बहिण रेश्मा खोपकर यांच्या मोबाईलवर अज्ञाताने बँकेचा अधिकारी असल्याचे सांगून दोघांच्या खात्याची माहिती घेतली. यानंतर प्रकाश खोपकर यांच्या खात्यातून सहा हजार १४१, तर रेश्मा यांच्या खात्यातून चार हजार ६३४ अशी एकूण १० हजार ७७५ रुपयांची रक्कम काढून घेतली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button