
प्रमुख किल्ल्यांच्या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्याचा विचार करावा–पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे
गडकिल्ले हे राज्याचे वैभव आहे. प्रत्येक किल्ल्याचा इतिहास मोठा आहे. त्याची माहिती आजच्या पिढीसह बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी प्रमुख किल्ल्यांच्या ठिकाणी महोत्सव आयोजित करण्याचा विचार करावा,” अशा सूचना राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिल्या.
पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहक, सुरक्षा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्था, गडकिल्ले संवर्धन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख प्रतिनिधी, सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी, शिवसेनेचे शहर उपप्रमुख किरण साळी यांच्यासह चाळीस ते पन्नास संस्थांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. त्या बैठकीत ठाकरे यांनी पर्यटन विभागाला या सूचना दिल्या.
www.konkantoday.com