
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कंपनीकडून दांडेवाडी येथील दोन रस्त्यांसाठी सुमारे सत्तर लाखाचा रुपयांचा निधी मिळाला
राजापूर तालुक्यातील दांडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उल्हास अंबोळकर आणि मुंबईस्थित दांडेवाडीचे ग्रामस्थ एच. व्ही. मयेकर यांच्या प्रयत्नामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कंपनीकडून दांडेवाडी येथील दोन रस्त्यांसाठी सुमारे सत्तर लाखाचा रुपयांचा निधी मिळाला आहे.नुकत्याच या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अणसुरे शाळा क्रमांक १ ते दांडे तेलीवाडी पर्यंत सुमारे सहाशे मीटर रस्त्यासाठी निधी प्राप्त झाला असून अतिशय उत्तम दर्जाचा सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. तर दांडे वाडीत मांडा पर्यंत येणाऱ्या रस्त्यासाठी देखील निधी प्राप्त झाला असून हा रस्ताही सिमेंट कॉंक्रिटचा बनविण्यात येणार आहे.
www.konkantoday.com