
लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहण्यासाठी कोलकोता येथील ‘नेताजी सुभाषचंद्र बोस मिशन’ या संस्थेची मोटरसायकल रॅली रत्नागिरीत
लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी पश्चिम बंगालमधील कोलकोता येथील ‘नेताजी सुभाषचंद्र बोस मिशन’ या संस्थेचे सुमारे ४० कार्यकर्ते आज, गुरूवारी संध्याकाळी ५ वाजता रत्नागिरीत येत आहेत.
सुभाषचंद्र बोस आणि टिळकांची प्रत्यक्षात भेट कधीच झाली नाही. पण सुभाषचंद्रांना टिळकांबद्दल नितांत आदर होता. म्हणूनच त्यांच्या विचारांचा प्रसार करणा-या कोलकोत्याच्या संस्थेच्या वतीने हा अनोखा आदरांजली कार्यक्रम करण्यात आला आहे.
मोटरसायकलस्वारांचा हा जथ्था गेल्या २६ जानेवारीला कोलकोत्याहून निघाला आहे . महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर(भगूर, जि. नाशिक),
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू(खेड, जि. पुणे), चापेकर बंधू (चिंचवड, जि. पुणे) यांना त्यांच्या जन्मस्थळी जाऊन आदरांजली अर्पण केली आहे.
आज, गुरूवारी संध्याकाळी ५ वाजता रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथे नगराध्यक्ष बंड्या साळवी रत्नागिरीकरांच्या वतीने या जथ्थ्याचे स्वागत करणार आहेत. रात्री त्यांचा रत्नागिरीत मुक्काम असून उद्या, शुक्रवारी सकाळी ते लोकमान्य टिळक जन्मस्थळावर जाऊन आदरांजली अर्पण करणार आहेत.
www.konkantoday.com