दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी मोहीम
राज्यातील दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी व भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी कृतीआराखडा तयार करा, असे निर्देश पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिले.राज्यामध्ये दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय तपासणी मोहीम राबविण्यात यावी. या मोहिमेमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग या तीनही विभागाच्या समन्वयाने एका पथकाची नियुक्ती करुन जकात नाका, चेक नाका, अशा विविध ठिकाणी धाडी टाकून भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. या कारवाईमध्ये पोलिसांनाही सहभागी करुन घ्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
www.konkantoday.com