
चिपळूण तालुक्यातील निरबाडे येथिल मैनुद्दीन चौघुले यांनादुबई येथे होणार्या कोकण मेळाव्यात निमंत्रित
सनईचे सुप्रसिद्ध वादक म्हणून जिल्ह्यात नावलौकीक असलेल्या चिपळूण तालुक्यातील निरबाडे या खेडेगावातील मैनुद्दीन चौघुले यांना या महिन्याच्या दुसर्या आठवड्यात दुबई येथे होणार्या कोकण मेळाव्यात सनईचा सूर छेडण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी चौघुले हे आपल्या सहकार्यांसमवेत दुबईला रवाना हाेत आहेत.
वयाच्या २१ व्या वर्षापासून चौघुले हे सनई वादनाचे धडे आत्मसात करत आहेत. यातूनच त्यांच्या हाताला रोजगारही प्राप्त झाला. गतवर्षीही दुबईतील कोकण मेळाव्यात चौघुले यांनी सनईवादन केले होते. यावेळी चौघुले यांच्यासह इम्तियाज चौघुले महम्मद चौघुले, यासिन चौघुले, महम्मद फकीर चौघुले, अजित चौघुले त्यांच्यासमवेत जात आहेत.
www.konkantoday.com