
पर्यटकांच्या गर्दीमुळेकोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या आठ गाड्यांचे डबे वाढविले
कोकण रेल्वेमार्गावरून धावणार्या आठ गाड्यांना डबे वाढवण्यात आले आहेत. डबे वाढवण्यात आलेल्या गाड्यांपैकी काही गाड्या या पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत.
पर्यटकांच्या गर्दीमुळे या मार्गावरून धावणार्या भावनगर-कोचुवेली (19260/59) पोरबंदर कोचुवेली (19262/61) या एकूण चार गाड्यांना प्रत्येकी एक वातानुकूलित थ्री टायर आणि दोन स्लीपर श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत. याचबरोबर जामनगर-तिरुनेलवेली (19578/77), हापा-मडगाव साप्ताहिक एक्स्प्रेस या चार गाड्यांना प्रत्येकी एक थ्री टायर श्रेणीचा अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे.दि. ४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२० या कालावधीत हे वाढीव डबे जोडण्यात येणार आहेत
www.konkantoday.com