एमआयडीसी परिसरात ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकची विजेच्या खांबाला धडक ,विद्युत प्रवाह खंडित
रत्नागिरी एमआयडीसी परिसरात जे के फाइल्स कंपनीच्या जवळ काल रात्री एका ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकने जवळील तीन विजेच्या खांबांना धडक दिली त्यामुळे हे काम कोसळून त्या परिसरातील विद्युत प्रवाह खंडित झाला हा ट्रक पुढे वेगाने जाऊन संरक्षण भिंतीवर आदळल्याने ती संरक्षण भिंतही कोसळली अपघातात कोणी जखमी झाले नाही मात्र विद्युत प्रवाह खंडीत झाल्याने सर्वत्र काळोख पसरला आता हा विद्युतप्रवाह सुरळीत झाला आहे
www.konkantoday.com