
माहिती अधिकारांतर्गत माहिती दिली नाही चिपळुणात न.प.इंजिनिअर व तक्रारदारांच्यात हाणामारी
चिपळूण नगरपालिकेत माहिती अधिकाराअंतर्गत मागितलेली माहिती न मिळाल्याने नवी मुंबई येथून आलेल्या आनंद मिस्त्री यांची नगरपालिकेचे इंजिनिअर परेश पवार यांच्याशी बोलाचाली होऊन मिस्त्री यांनी पवार यांना मारहाण केली.त्यानंतर तो तेथून निघून गेला .हा प्रकार कर्मचाऱ्यांना कळल्यावर मिस्त्री याला याला परत नगरपालिकेत आणण्यात आले त्याला मारहाण करण्यात आली यामुळे आता दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com