जिल्हा कारागृहातील संशयित आरोपींचा मृत्यू
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून धिंगाणा घातल्याप्रकरणी देवरुख पोलिसांनी अटक केलेल्या व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या सखाराम गोरुले राहणार देवरुख याचा जिल्हा विशेष कारागृहात मृत्यू झाला सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घातल्याप्रकरणी तो न्यायालयीन कोठडीत होता सोमवारी गोरुले याची प्रकृती अचानक बिघडली त्याला कारागृहातून तातडीने शासकीय रुग्णालयात आणण्यात आले परंतु तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी जाहीर केले गोरुले यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही
www.konkantoday.com