
खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या नव्या दालनाचे शिवजयंतीदिनी उदघाटन
खेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या नव्या दालनाच्या कामावरून उफाळलेल्या वादाची कोंडी फुटून महिनाभराचा कालावधी लोटूनही नव्या दालनाच्या कामास १ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला असून शिवजयंतीला १९ फेब्रुवारीला नवे दालन खुले होणार आहे. या दालनाचे उदघाटन नगर परिषदेील सफाई कर्मचार्यांच्या हस्ते करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी दिली. नगराध्यक्ष खेडेकर यांनी ५८-२ नुसार विशेषाधिकार वापरून दालनाच्या नुतनीकरणास २२ लाख रुपयांची तरतूद करून बांधकामास सुरूवात केली होती. शिवसेनेच्या बांधकाम समिती सभापती नम्रता वडके यांनी बांधकामाबाबत आक्षेप घेत कलम ३०८ खाली थेट जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती.
www.konkantoday.com