
कोकण रेल्वे समस्या मार्गी लावणार: खा. सुनील तटकरे
मुंबई ः कोकण रेल्वेच्या समस्या तसेच अनेक प्रलंबित प्रश्नांबाबत रायगडचे खा. सुनिल तटकरे यांनी कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्यासोबत बेलापूर येथे चर्चा केली.
यावेळी रेल्वेतील सुरक्षा, खेड दिवाणखवटी तसेच कोलाड येथील प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, रत्नागिरीतील शिरवली स्थानकावर रेल्वे क्रॉसिंगसाठी ओव्हर ब्रीज बांधणे तसेच गणेशोत्सवासाठी विशेष गाडी सुरू करणे याबाबतच्या मागण्या आपण समोर ठेवल्या व त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना या प्रकल्पात सामावून घेण्याच्या विषयावरही यावेळी चर्चा झाली.