अधिकार्यांना तीन महिने तुरूंगात पाठविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना तीन महिने तुरूंगात ठेवण्याची दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली. मारूतीमंदिर येथील एक दुकान हटविल्याप्रकरणी खटल्याचा निकाल देवून न्यायालयाने त्या शेडच्या बांधकामाचा खर्च देण्याचा आदेश केला होता. रनपकडून या आदेशाचा भंग झाला. ज्या कायद्याच्या तरतुदीनुसार तुरूंगात पाठविण्याची मागणी झाली तो कशासाठी आहे, हे रनपचे वकील ऍड. निलांजन नाचणकर यांनी युक्तीवाद करून न्यायालयाला पटवून दिले. हा युक्तीवाद मान्य करत न्यायालयाने दावा दाखल करणार्या चंद्रकांत सुर्वे यांची मुख्याधिकार्यांना तुरूंगात पाठवण्याबाबतची मागणी फेटाळली.
www.konkantoday.com