स्कुबा डायव्हिंग आणि प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांवर मालवणमध्ये कारवाई


स्कुबा डायव्हिंग आणि प्रवासी वाहतुकीचा परवाना नसतानाही पर्यटन व्यवसाय करणाऱ्यांवर बंदर विभागाने मालवणमध्ये बडगा उगारला. या कारवाईत ८ व्यावसायिकांचे सिलेंडर पथकाने ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, या कारवाई विरोधात संबंधित व्यावसायिकांनी मालवण बंदर कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. मात्र बंदर अधिकारी अमोल ताम्हणकर व यु. आर. महाडिक यांनी ही कारवाई प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे स्पष्ट केले.आम्ही परवानगी मागत असताना परवानगी मिळत नाही. पर्यटन वाढीस पाठबळ न देता केवळ कारवाई हाच बंदर विभागाचा एककलमी कार्यक्रम आहे. या विरोधात प्रसंगी समुद्रात आंदोलन करणार असल्याचा इशारा दामोदर तोडणकर, गौरव प्रभू, अमित आडवलकर व अन्य व्यावसायिकानी दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button