
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे–
परिवहन मंत्री अनिल परब
राज्यातील बस स्थानकांमधील स्वच्छता, बसण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विशेष लक्ष देऊन प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करावे, सर्व सुविधांनी युक्त अशा अत्याधुनिक बसस्थानकांचे आराखडा सादर करण्याचे निर्देश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले. त्यामुळे येत्या काळात राज्यातील एसटीची स्थानके कात टाकणार असल्याची चर्चा परिवहन विभागात सुरू झाली आहे.
मंत्रालयात बस स्थानकातील स्वच्छता आणि नवीन बसस्थानक उभारण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी परब बोलत होते. त्यामुळे आता एसटीची नवी स्थानके कशी रुप घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
www.konkantoday.com