
आता राजापुरातील आयलॉग प्रकल्पाच्या विरोधात महामोर्चा
राजापुरातील अणुऊर्जा प्रकल्प व त्यानंतर रिफायनरी प्रकल्पाला विरोध केल्यानंतर आता राजापूर तालुक्यातील आंबोळगड येथे होणाऱ्या आयलॉग प्रकल्पाविरोधात जनहक्क सेवा समितीच्यावतीने सहा फेब्रुवारीला महामोर्चा काढण्यात येणार आहे
नाटे आंबोळगड या समुद्र किनाऱयावर आयलॉग कंपनीच्यावतीने बंदर उभारण्यात येणार आहे या बंदरासाठी कंपनीकडून जागेची खरेदीही झाली आहे २०१७मध्ये जनसुनावणी मराठीतून करावी या मागणीसाठी स्थानिकांनी या सुनावणीला विरोध केला होता २०१९साली जनसुनावणीला लोकांनी विरोध केला मात्र प्रशासनाने जन सुनावणीची प्रक्रिया पूर्ण केली होती आता हा प्रकल्प येथे होऊ नये यासाठी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येणार आहे
www.konkantoday.com