आडिवरे-कशेळी येथील सुर्यमंदिर श्रीदेव कनकादित्यच्या रथसप्तमी उत्सवाला प्रारंभ
राजापूर तालुक्यातील महाराष्ट्रातील एकमेव असलेले पुरातन आडिवरे-कशेळी येथील सुर्यमंदिर श्रीदेव कनकादित्यच्या रथसप्तमी उत्सवाला प्रारंभ झाला आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. उत्सवानिमित्त श्री श्रीकालिकासहित कनकादित्यच्या मूर्तींना रूपे चढविण्यात आली आहेत. देवतांची ही देखणी रूपे पाहण्यासाठी व दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
श्री कनकादित्य हे सुर्यमंदिर अतिशय पुरातन आहे. महाराष्ट्रातील हे एकमेव पुरातन सुर्यमंदिर आहे. गतवर्षी या मंदिराच्या सभामंडपाचा जीर्णोद्धार करण्यात आला. सागवानी लाकूड वापरून सभामंडपाचे खांब तयार करण्यात आले असून त्यांना आकर्षक नक्षीकाम करण्यात आले आहे.
www.konkantoday.com